Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?

Icc Odi Batting Ranking : टीम इंडियाने अफगाणिस्तानचा वनडे सीरिजमध्ये 3-0 फरकाने धुव्वा उडवला. भारताच्या फलदाजांना या मालिकेत केलेल्या कामगिरीचा आयसीसी क्रमवारीत चांगलाच फायद झाला आहे.

| Updated on: Jun 24, 2026 | 10:42 PM
1 / 5
आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप 4 मध्ये कोण कोण आहेत? हे जाणून घेऊयात.  (Photo Credit : PTI)

2 / 5
आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल पहिल्या स्थानी आहे. डॅरेलच्या नावावर एकूण 815 रेटिंग पॉइंट्स आहेत. (Photo Credit : PTI)

3 / 5
भारतीय कर्णधार शुबमन गिल याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. शुबमनने 3 स्थानांची उडी घेत दुसरं स्थान पटकावलं आहे. शुबमनला अफगाणिस्तान विरुद्ध केलेल्या कामगिरीचा वनडे रँकिंगमध्ये चांगलाच फायदा झाला आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याची दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. विराटच्या खात्यात ताज्या आकडेवारीनुसार 768 रेटिंग पॉइंट्स आहेत. विराटला अफगाणिस्तान विरूद्धच्या 3 मॅचच्या वनडे सीरिजला दुखापतीमुळे मुकावं लागलं होतं. (Photo Credit : PTI)

5 / 5
भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा चौथ्या स्थानी आहे. रोहितने त्याचं चौथं स्थान यशस्वीरित्या कायम राखलं आहे. रोहितच्या खात्यात 754 पॉइंट्स आहेत.(Photo Credit : PTI)

Follow Us