
कोलकाता कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताला 30 धावांनी पराभूत केलं. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता मालिकेत क्लिन स्विपची भीती सतावत आहे. असं असताना भारताचं टेन्शन दुसऱ्या कसोटीपूर्वी वाढलं आहे. कारण शुबमन गिलला दुखापत झाली आहे. फलंदाजी करताना त्याच्या मानेला दुखापत झाली आणि त्यामुळे पुढे खेळू शकला नाही. (PHOTO CREDIT- PTI)

शुबमन गिलला तात्काळ कोलकात्याच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टराच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरु होते. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिडिया रिपोर्टनुसार गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

शुबमन गिलला डिस्चार्ज मिळाला असला तरी मैदानातर परतणार नाही. रिपोर्टनुसार, शुबमन गिलला 4 ते 5 दिवसांचा आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे या सामन्यात खेळेल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे काही दिवस वाट पाहावी लागेल. (PHOTO CREDIT- PTI)

शुबमन गिलला पहिल्या डावाच्या तिसऱ्या चेंडूचा सामना करताना दुखापत झाली होती. स्वीप शॉट खेळताना त्याच्या मानेला दुखापत झाली. त्यानंतर फिजिओ मैदानात आणि थोड्या वेळात रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलाच नाही. (PHOTO CREDIT- PTI)

कोलकाता कसोटीनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरने गिलच्या दुखापतीबाबत अपडेट दिले होते. गौतम गंभीर म्हणाला की, 'शुबमन गिलच्या दुखापतीची तपासणी केली जात आहे. गिल कधीपर्यंत फिट होईल आणि गुवाहाटीत खेळेल की नाही यावर फिजिओ निर्णय घेईल.' (PHOTO CREDIT- PTI)