विराट कोहली याने सोमवारी 12 मे रोजी कसोटी क्रिकेटला रामराम केला. विराटने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली. विराटने 14 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. तसेच विराटने कर्णधार म्हणूनही दमदार कामगिरी केली. विराटने 123 सामन्यांमध्ये 31 अर्धशतकं, 30 शतकं आणि 7 द्विशतकांसह एकूण 9 हजार 230 धावा केल्या. विराट कसोटीत चौथ्या स्थानी खेळायचा. मात्र त्याच्यानंतर आता चौथ्या स्थानी कोण खेळणार? या चौथ्या स्पॉटसाठी 4 खेळाडू दावेदार आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Virat Kohli X Account)

श्रेयस अय्यर याने कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक केलंय. तसेच श्रेयसने बीसीसीआयचा वार्षिक करारही मिळवला. अय्यरने 2021 साली कसोटी पदार्पण केलं. मात्र श्रेयसला सातत्याने धावा करता आल्या नाहीत. श्रेयस जानेवारी 2024 साली कसोटी संघातून बाहेर पडला. मात्र श्रेयसने 2024-2025 रणजी ट्रॉफीत 68.57 च्या सरासरीने 480 धावा केल्या. (Photo Credit : Shreyas Iyer X Account)

सर्फराज खान याने कसोटी पदार्पणात आपली छाप सोडली. सर्फराजने आतापर्यंत 11 डावांमध्ये 4 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. सर्फराजने न्यूझीलंड विरुद्ध 150 धावा केल्या. सर्फराजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 65.91 अशा अप्रतिम सरासरीने धावा केल्या आहेत. (Photo Credit : Sarfaraz Khan X Account)

देवदत्त पडीक्कल मधल्या फळीत खेळतो. देवदत्तने 3 कसोटी सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 90 धावा केल्या आहेत. यामध्ये एकमेव अर्धशतकाचा समावेश आहे. देवदत्तने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 41.39 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. (Photo Credit : Indian Cricket Team Facebook Page)