
टीम इंडियाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने गेल्या काही महिन्यातच आपली ओळख निर्माण केली आहे. अभिषेकने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही जबरदस्त कामगिरी केली आहे. अभिषेकने आता एका कंपनीसह करार केला आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेकने लोट्टो स्पोर्ट्ससह करार केला आहे. भारतात नुकतंच लोट्टो स्पोर्ट्सची सुरुवात झाली आहे. इटली या देशातील ब्रॅड स्पोर्ट्स आणि फॅशनशी संबंधित आहे. क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिषेक शर्मा हे दोघेही लोट्टो स्पोर्ट्ससह जोडले गेले आहेत. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेकला लोट्टो स्पोर्ट्सकडून एका शूटसाठी 10 लाख रुपये मिळणार आहेत. ही रक्कम म्हणजे अभिषेकची क्रिकेटमधील कामगिरी आणि त्याची फॅनफॉलोईंगचं बक्षिस आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अभिषेक आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादचं आणि टी 20I फॉर्मटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतो. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

लोट्टो स्पोर्ट्सचं पुढील 5 वर्षात 1 हजार कोटींची ब्रँड वॅल्यू प्राप्त करण्याचं लक्ष्य आहे. त्यासाठी लोट्टो स्पोर्ट्सने त्यांच्यासह अभिषेकला जोडलं आहे. अभिषेकचे भारतासह विदेशातही असंख्य क्रिकेट चाहते आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

अभिषेक शर्मा याने आतापर्यंत टीम इंडियाचं 17 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. अभिषेकने टी 20I क्रिकेटमध्ये 2 शतकं आणि 2 अर्धशतकांसह एकूण 535 धावा केल्या आहेत. तसेच अभिषेकने आयपीएलमधील 77 सामन्यांमध्ये 1 हजार 816 धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT- PTI)