
विराट कोहली भारतासाठी गेल्या काही मालिकांमध्ये सातत्याने धावा करत आहेत. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच विराट मोठी खेळी करण्यासह विक्रमही मोडीत काढत आहे. (Photo Credit: PTI)

विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्यात. तसेच विराट छोट्या मोठ्या खेळीसह दिग्गज मादी फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत आहे. (Photo Credit: PTI)

विराटच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. तसेच विराटने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात 93 धावा केल्या. विराटने यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 28 हजार धावांचा टप्पा गाठला. विराट यासह आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमधील मिळून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. (Photo Credit: PTI)

विराटने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या 2 सामन्यात अनुक्रमे 93 आणि 23 अशा एकूण 116 धावा केल्या. विराटच्या नावावर अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमध्ये मिळून एकूण 36 हजार 716 धावा झाल्या आहेत. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 28 हजार 91 धावा केल्या आहेत. तर विराटच्या नावावर आयपीएलमध्ये 8 हजार 661 धावांची नोंद आहे. (Photo Credit: PTI)

विराटने रेकॉर्ड ब्रेक केल्याने सचिनची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. सचिनच्या नावावर एकूण 36 हजार 691 धावांची नोंद आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 हजार 357 धावा केल्या आहेत. तसेच सचिनने आयपीएलच्या 6 हंगामांमध्ये 2 हजार 334 धावा केल्या आहेत. (Photo: Getty Images)