IPL 2027 स्पर्धेत हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार का? CSKच्या विधानानंतर सस्पेन्स संपला
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या सुमार कामगिरीनंतर हार्दिक पांड्या फ्रेंचायझी सोडणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. पुढच्या पर्वात नव्या फ्रेंचायझीकडून खेळणार आहे, अशीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पण हार्दिक पांड्या किंवा मुंबई इंडियन्सने याबाबत भाष्य केलेलं नाही.

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे आयर्लंडनंतर इंग्लंड दौऱ्याला मुकला आहे. असं असताना मुंबईहून बंगळूरुला स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे आयपीएल भविष्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. पण बीसीसीआयच्या पुनवर्सन केंद्रात योग्य उपचार घेता यावेत यासाठी हार्दिक तिथे शिफ्ट झाला आहे. (Photo: IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून सलग तीन हंगाम अपयशी ठरल्यानंतर हार्दिक पांड्या फ्रँचायझी सोडून जाईल अशी जोरदार चर्चा आहे. पुढच्या हंगामात हार्दिक एका नवीन संघात सामील होईल, असं बोललं जात आहे. पण कोणता संघ असेल हे अस्पष्ट आहे. आयपीएल ट्रेडिंग विंडो उघडल्यापासूनच या चर्चांना अधिकच जोर चढला आहे. (Photo: IPL/BCCI)

ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांची ट्रेड झाल्यानंतर चर्चांना आणखी जोर आला आहे. हार्दिक पांड्या आणि त्याच्याबाबतच्या चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरत आहेत. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून पुढच्या पर्वात खेळेल असं बोललं जात आहे. पण या बातमीचं चेन्नई सुपर किंग्सने खंडन करून पूर्णविराम दिला आहे. (Photo: IPL/BCCI)

चेन्नई सुपर किंग्सने सर्व दावे फेटाळून लावले आहेत. फ्रेंचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीएसकेने हार्दिक पांड्याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही आणि संघाची सध्या तशी कोणतीही योजना नाही. (Photo: IPL/BCCI)

कासी विश्वनाथन पुढे म्हणाले, "सीएसकेने अद्याप आपल्या आयपीएल हंगामाचा आढावा घेतलेला नाही आणि एमएलसी हंगाम संपल्यानंतरच ते तसे करतील. आम्ही कोणाशीही बोललो नाही आणि हार्दिक व सीएसकेबद्दल जे काही बोलले जात आहे ते खरे नाही." (Photo: IPL/BCCI)