
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी समोर आहे. मेगा लिलावात सर्वाधिक भाग खाणार्या खेळाडूंची नावं या यादीत आहेत. यात कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरसह पाच खेळाडूंची नावं आहेत. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत... (फोटो- pti)

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक खेळाडू रिलीज केले आहेत. त्यामुळे मिनी लिलावासाठी त्यांच्या पर्समध्ये 64.3 कोटी रुपये आहेत. कोलकात्याच्या रकमेत इतकी वाढ होण्याचं कारण म्हणजे वेंकटेश अय्यर.. मेगा लिलावात त्याला 23.75 कोटींना विकत घेतलं होतं. मात्र आता त्याला रिलीज केलं आहे. (Photo-PTI)

वेंकटेश अय्यरनंतर कोलकाता नाईट रायडर्सने रिलीज केलेला सर्वात महागडा खेळाडू हा आंद्रे रसेल.. मागच्या पर्वात कोलकात्याने त्याला एक पर्वासाठी 12 कोटी मोजले होते. मात्र आता त्याला रिलीज केलं आहे. त्यामुळे त्याच्या मिनी लिलावात किती बोली लागते याकडे लक्ष असणार आहे. (Photo- AFP)

आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या मथीशा पथिराना यालाही रिलीज केलं आहे. त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने 13 कोटी मोजले होते. आता सीएसकेच्या पर्समध्ये 43.4 कोटी असून कोणत्या खेळाडूंना संघात घेते याकडे लक्ष असेल. (Photo- IPL/BCCI)

लखनौ सुपर जायंट्सने देखील फासे टाकले आहेत. 11 कोटी रूपये मोजलेल्या रवि बिश्नोईला रिलीज केलं आहे. त्यामुळे मिनी लिलावात त्याच्यावरही बोली लागेल. लखनौ सुपर जायंट्सच्या पर्समध्ये आता 22.95 कोटी रुपये आहेत. (Photo- IPL/BCCI)

गतविजेत्या आरसीबीने लियाम लिविंगस्टोनला रिलीज केलं आहे. मेगा लिलावात त्याच्यासाठी 8.75 कोटींची बोली लावली होती. पण आता त्याला संघाने सोडलं आहे. ( Photo: George Wood - ECB/ECB via Getty Images)