
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत टी 20I मालिकेला बुधवार 29 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. टीम इंडियाने एकदिवसीय मालिका गमावली. त्यामुळे भारताचा टी 20I मालिका जिंकून ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. या निमित्ताने भारत-ऑस्ट्रेलिया टी 20I सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci)

भारत-ऑस्ट्रेलिया टी 20I सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये माजी फलंदाज विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने 23 सामन्यांमध्ये 794 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Bcci)

अनुभवी ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल टीम इंडिया विरुद्ध टी 20I सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज आहे. मॅक्सवेल याने 22 सामन्यांमध्ये 574 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि कर्णधार एरॉन फिंच तिसर्या स्थानी आहे. फिंचने 18 सामन्यांमध्ये 500 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

ऑस्ट्रेलियाचा माजी अनुभवी विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेड चौथ्या स्थानी आहे. वेडने 17 मॅचेसमध्ये 488 रन्स केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

माजी कर्णधार-फलंदाज रोहित शर्मा या यादीत पाचव्या स्थानी आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 23 टी 20 सामन्यांमध्ये 484 धावा केल्या होत्या. (Photo Credit : Bcci)