
टी 20I टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यात 24 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. सूर्याने या खेळीत 2 सिक्स लगावले. सूर्याने यासह खास यादीत स्थान मिळवंल. सूर्या टी 20I क्रिकेटमध्ये 150 सिक्स लगावणारा एकूण चौथा तर दुसरा भारतीय फलंदाज ठरला. या निमित्ताने इतर 4 सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci X Account)

टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विश्व विक्रम हा टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 151 डावांत सर्वाधिक 205 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : Bcci)

सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसर्या स्थानी मार्टिन गुप्टील विराजमान आहे. गुप्टीलने 118 डावांत 173 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : Icc X Account)

इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर तिसऱ्या स्थानी आहे. बटलरने 132 इनिंगमध्ये 172 सिक्स झळकावले आहेत. (Photo Credit :AFP)

तर पाचव्या क्रमांकावर विंडीजचा माजी फलंदाज निकोलस पूरन आहे. पूरनने 97 डावांत 149 षटकार लगावण्याची कामगिरी केली होती. (Photo Credit : PTI)