
आयपीएलच्या 18 व्या मोसमाची सांगता झाला आही. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनलमध्ये पंजाब किंग्जवर विजय मिळवत पहिलीवहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. या निमित्ताने आयपीएल स्पर्धेतून सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

विराट कोहली याने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेतून सर्वाधिक कमाई केली आहे. विराट आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून खेळतोय. आरसीबीने 18 व्या मोसमात विराटसाठी 21 कोटी रुपये मोजून त्याला रिटेन केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराटने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेतून 207.96 कोटी रुपये कमावले आहेत. (Photo Credit : PTI)

चेन्नई सुपर किंग्सला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा महेंद्रसिंह धोनी हा देखील पहिल्या हंगामापासून खेळतोय. धोनी आयपीएलमधील कमाईबाबत दुसऱ्या स्थानी आहे. धोनीला चेन्नईने 18 व्या मोसमासाठी 4 कोटींमध्ये रिटेन केलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीने 205.34 कोटी रुपये छापले आहेत. (Photo Credit : PTI)

रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिलीय. रोहितला मुंबईने 18 व्या मोसमासाठी 16.30 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. मीडिया रिपोर्ट्नुसार, रोहितने आयपीएलच्या माध्यमातून 204.90 कोटी रुपये कमावले आहेत. (Photo Credit : PTI)

ऑलराउंडर रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जडेजाने या स्पर्धेतून 127 कोटी कमावले आहेत. जडेजाला सीएसकेने 18 व्या मोसमासाठी 18 कोटी रुपये खर्चून आपल्यासोबत कायम ठेवलं होतं. (Photo Credit : PTI)

सुनील नारायण याने या स्पर्धेतून 119.02 कोटी रुपये कमावले आहेत. सुनील कोलकाता नाईट रायडर्सच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. सुनीलने केकेआरसाठी बॅटिंग आणि बॉलिंगने अप्रतिम कामगिरी केली आहे. (Photo Credit : PTI)