
ऑस्ट्रेलियान टीम इंडियाचा 79 धावांचा धुव्वा उडवत चौथ्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियाचा या पराभवासह सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. टीम इंडियाच्या या पराभवाला भारतीय आडवा आला. ऑस्ट्रेलियाचा हरजस सिंह हा टीम इंडियाच्या पराभवाचा व्हीलन ठरला. हरजस याने केलेल्या अर्धशतकी खेळीने टीम इंडियाचा पराभव निश्चित केला.

अंडर 19 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज हरजस सिंह याने 64 बॉलमध्ये 55 धावांची खेळी केली. हरजसने 3 चौकार आणि 3 षटकार ठोकले. हरजसच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 254 धावांचं आव्हान ठेवलं.

हरजस सिंह आणि भारताचं नातं आहे. हरजसाचा जन्म 2005 साली सिडनीत झाला. हरजसचं कुटुंब 2000 साली चंडीगडवरुन सिडनीत स्थायिक झालं.

हरजसला घरातूनच खेळाचा वारसा मिळाला. हरजसचे वडील इंद्रजीत सिंह राज्य स्तरावर बॉक्सिंग चॅम्पियन राहिले आहेत. तर हरजसची आई अविंदर कौर या देखील लाँग जंपर राहिल्या आहेत.

हरजस सिंह याने दिलेल्या माहितीनुसार, चंडीगड आणि अमृतसर त्याचे कुटुंबिय राहतात. हरजस अखेरचा 2015 भारतात आला होता.