
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारत आणि अमेरिका हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात अमेरिकेने भारतासमोर 108 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य गाठताना वैभव सूर्यवंशी अवघ्या 2 धावांवर बाद झाला. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. पण असं असूनही वैभव सूर्यवंशी एक विक्रम नावावर करून गेला. (Photo: BCCI Twitter)

वैभव सूर्यवंशीने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 14 वर्षे 294 दिवसांचा असताना पदार्पण केलं आहे. त्यामुळे जगातील अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार वयाने लहान खेळाडू ठरला. यापूर्वी अवघ्या 15व्या वर्षी अंडर 19 वनडे वर्ल्डकप खेळलेलं नाही. कॅनडाच्या नितीश कुमारने 15 वर्षे आणि 245 दिवसांचा असताना अंडर 19 वर्ल्डकप खेळला आहे. (Photo: BCCI Twitter)

कॅनडाच्या नितीश कुमारने 2010 मध्ये हा विक्रम रचला होता. आता हा विक्रम 16 वर्षांनी वैभव सूर्यवंशीने मोडला आहे. अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि हा विक्रम नावावर केला. (Photo: BCCI Twitter)

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत नेतृत्व करणारा सर्वात कमी वयाचा कर्णधार ठरला होता. त्याने वय वर्षे 14 आणि 282 दिवस असताना कर्णधारपद भूषवलं होतं. याआधी हा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार अहमद शहजाद (15वर्षे 141 दिवस) याच्या नावावर होता. (Photo: BCCI Twitter)

वैभव सूर्यवंशीने अमेरिकेविरुद्ध नितीश सुदिनीला बाद केले. यासोबतच वैभव अंडर 19 विश्वचषकाच्या इतिहासात विकेट घेणारा सर्वात तरुण गोलंदाज बनला. यापूर्वी यूथ वनडेत शतकी खेळी करणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात कमी वयाचा कर्णधार ठरला होता. त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 74 चेंडूत 127 धावा केल्या होत्या. (Photo: BCCI Twitter)