वैभव सूर्यवंशीच्या बॅटवर त्याचंच नाव चुकीचं लिहिलं जातं, कारण की…

वैभव सूर्यवंशीने अल्पावधीतच क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळवला आहे. नुकताच पार पडलेल्या अंडर वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील जेतेपदात त्याचा मोलाचा हातभार राहिला. आता वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये फलंदाजीचा सराव करत आहे. यावेळी एक गोष्ट निदर्शनाश आली.

| Updated on: Feb 17, 2026 | 10:26 PM
1 / 5
अंडर 19 वनडे वर्ल्डकप जेतेपदानंतर वैभव सूर्यवंशी आता आयपीएलच्या तयारीला लागला आहे. आयपीएल स्पर्धा पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. या स्पर्धेत वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सकडून मैदानात उतरणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये तो कठोर सराव करत आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
सरावादरम्यान आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीने बॅटबद्दल मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्यान शुभम दुबेच्या बॅटचे कौतुक केलं. तेव्हा त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचं लक्ष वैभवच्या बॅटकडे गेलं आणि त्यावर त्याचे नाव लिहिलेलं पाहिलं. तेव्हा वैभवच्या बॅटवर त्याला नाव चुकीचं दिसलं. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
वैभव सूर्यवंशीचे नाव प्रत्येक बॅटवर चुकीचे का लिहिले जाते हे खेळाडूने स्वतःच स्पष्ट केले. कारण त्याचं नाव मोठं आहे.  त्यामुळे Vaibhav Sooryavanshi  ऐवजी Vaibhav Suryavanshi असं लिहिलं जातं. बॅटच्या स्टिकरवर मर्यादित जागेमुळे असं लिहिलं जातं. (Photo- Rajasthan Royals Twitter )

4 / 5
वैभव सूर्यवंशी परीक्षेत गैरहजर राहिल्यामुळे चर्चेत आला होता. यावर्षी तो दहावीच्या बोर्ड परीक्षा देणार होता, परंतु त्याने आयपीएलची तयारी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यवंशी सध्या 26 मार्चपासून सुरू स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्सच्या शिबिरात सराव करत आहे. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात 175, सेमीफायनलमध्ये 68 धावा केल्या हो्त्या. वैभव सूर्यवंशीने गेल्या आयपीएल हंगामात सात सामने खेळले होते. यात 36 च्या सरासरीने 252 धावा केल्या होत्या. (Photo- BCCI Twitter)