विराट कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी वैभव सूर्यवंशीला फक्त 6 धावांची आवश्यकता, काय ते जाणून घ्या

आयसीसी अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या अंडर 19 टीम इंडियावर असणार आहे. टीम इंडियाकडे चांगले आणि सामना जिंकवणारे खेळाडू आहेत. यात एक नाव आहे वैभव सूर्यवंशीचं.. वैभवकडे एक विक्रम मोडणअयाची संधी आहे.

| Updated on: Jan 13, 2026 | 8:02 PM
1 / 5
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा 2026 ही 15 जानेवारीपासून सुरु होणार आहे. भारताचा पहिलाच सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यासाठी कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात संघ सज्ज आहे. दुसरीकडे फॉर्मात असलेल्या उपकर्णधार वैभव सूर्यवंशीकडेही नजरा असणार आहे.(Photo: BCCI Twitter)

2 / 5
 वैभव गेल्या दिवसांपासून धावांचा वर्षाव करत आहे. या स्पर्धेत विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. वैभव सूर्यवंशी सराव सामन्यात फार काही करू शकला नाही. पण स्पर्धा सुरू होताच त्याची बॅट पुन्हा तळपेल अशी आशा क्रीडाप्रेमींना आहे. त्यामुळे त्याच्या रडारवर विराट कोहलीचा विक्रम असणार आहे. पहिल्याच चेंडूवर हा विक्रम मोडू शकतो. (Photo: BCCI Twitter)

3 / 5
14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 6 धावा करताच विराट कोहलीचा विक्रम मोडणार आहे. विराट कोहलीने अंडर 19 यूथ वनडेत एकूण 28 सामने खेळले आहे. यातील 25 डावात 46.57 च्या सरासरीने 978 धावा केल्या आहेत. (Photo- PTI)

4 / 5
वैभव सूर्यवंशी 18 सामन्यात 54.05 च्या सरासरीने 973 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार मारला तर विषयच संपला. अंडर 19 क्रिकेटमध्ये विजय जोल आघाडीवर आहे. त्याने 2012 ते 2014 या कालावधीत 36 यूथ वनडे खेळले आणि 1404 दावा केल्या आहेत. 1400 धावा करणारा भारताचा एकमेव खेळाडू आहे. (Photo: BCCI Twitter)

5 / 5
वैभव सूर्यवंशी विराट कोहलीचाच नाही तर शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वालचा विक्रमही मोडीत काढू शकतो. त्याचा विक्रम मोडण्यासाठी वैभव सूर्यवंशीला या स्पर्धेत 400हून अधिक धावा कराव्या लागतील. वैभवचा फॉर्म पाहता त्याला हे गणित सहज सोपं होईल असं वाटत आहे. (Photo:Michael Steele/Getty Images)