
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत एका विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. चौथ्या फेरीत बडोदा आणि हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाच फलंदाजांनी शतक ठोकलं. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

या सामन्यात बडोद्याच्या तीन फलंदाजांनी, तर हैदराबादच्या दोन फलंदाजांनी शतक ठोकलं. या सामन्यात अशी पाच शतकं आली. लिस्ट ए क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं. (PHOTO CREDIT- PTI)

बडोद्याकडून नित्या पंड्याने 100 चेंडूत 122 धावा ठोकल्या. यात 12 चौकार आणि 1 षटकार मारला. अमित पासीने 93 चेंडूत 127 धावा ठोकल्या. यात त्याने 12 चौकार आणि 7 षटकार मारले. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

बडोद्याकडून मग कर्णधार कृणाल पंड्या उतरला आमि त्याने 63 चेंडूत नाबाद 109 धावांची खेळी केली. यात 18 चौकार आणि 1 षटकार मारला. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 173.03चा होता. कृणाल पंड्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा शतक ठोकलं आहे. (PHOTO CREDIT- PTI)

हैदराबादकडून अभिरथ रेड्डीने 90 चेंडूत 130 धावा केल्या. यात 18 चौकार आणि 2 षटकार मारले. तर प्रज्ञान रेड्डीने 98 चेंडूत 113 धावा केल्या. पण दोघंही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. बडोद्याने 418 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. हैदराबादने 380 धावांपर्यंत मजल मारली. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)