
पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात विराट कोहली याने नाबाद 122 धावांची खेळी केली आहे. यात 9 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. यासह त्याने विक्रमांची नोंद केली.

विराट कोहली याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली आहे. वनडे कारकिर्दित 13 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. 13 हजार धावा पूर्ण करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे.

विराट कोहली याच्या आधी सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पॉटिंग आणि सनथ जयसूर्या यांनी 13 हजार धावांहून अधिक पूर्ण केल्या आहेत.

विराट कोहली याने कमी डावात 13 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. यासह त्याने विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला आहे.

विराट कोहली याने 267 सामन्यात, सचिन तेंडुलकरने 321 सामन्यात, रिकी पॉटिंगने 341 सामन्यात, कुमार संगकाराने 363 आणि सनथ जयसूर्याने 416 सामन्यात 13 हजार धावा केल्या आहेत.

विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 200 धावांची भागीदारी केली. आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धची ही भारताची मोठी भागीदारी आहे. पाकिस्तान विरुद्ध नाबाद 233 धावांची भागीदारी केली.