
टीम इंडियाचा माजी लेग-स्पिनर पीयूष चावला याने 6 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. टीम इंडियाने 2007 साली टी 20i तर 2011 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. पीयूष चावला या दोन्ही संघात होता. (Photo Credit: Instagram)

पीयूष चावलाच्या निवृत्तीनंतर एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे. तसेच चावलाच्या निवृत्तीमुळे टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली एकटा पडला आहे. (Photo Credit: Getty Images)

टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात 2 एप्रिल 2011 साली श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनी वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. पीयूष चावला 15 सदस्यीय वर्ल्ड कप संघाचा भाग होता. (Photo Credit: Getty Images)

पीयूष चावला याच्या निवृत्तीनंतर वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातील विराट कोहली हा आता एकटा सक्रीय क्रिकेटर राहिला आहे. विराटचा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 2011 सालचा पहिलावहिला वनडे वर्ल्ड कप होता. (Photo Credit : Getty Images)

विराटव्यतिरिक्त वनडे वर्ल्ड कप 2011 संघातील उर्वरित 14 खेळाडू निवृत्त झाले आहेत. यामध्ये महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, सुरेश रैना, युसूफ पठाण, हरभजन सिंह, आर अश्विन, झहीर खान, आशिष नेहरा, एस श्रीसंथ, पीयूष चावला आणि मुनाफ पटेल यांचा समावेश आहे. (Photo: Getty Images)