
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीसमोर विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान आरसीबीने 17.3 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे विजय सोपा झाला. विराट कोहलीने नाबाद 62 धावांसह शतक ठोकलं आहे.

विराट कोहलीने 40 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह किंग कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतके पूर्ण करण्याचा विक्रम केला.या सामन्यात 45 चेंडूंचा सामना करणाऱ्या कोहलीने 137.78 च्या स्ट्राईक रेटने 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 62 धावा केल्या.

विराट कोहलीपूर्वी कोणत्याही आशियाई खेळाडूला एकदिवसीय सामन्यात 100 अर्धशतके झळकावता आलेली नाहीत. विराट कोहलीने त्याच्या टी20 कारकिर्दीतील 100 वे अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे.

डेविड वॉर्नर हा टी20 मध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा पहिला खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 108 अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहली आता 100 अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर बाबर आझम असून त्याने 90 अर्धशतके झळकावली आहेत. ख्रिस गेल चौथ्या स्थानावर असून 88 अर्धशतके केली आहेत.

आयपीएलमध्ये कोहलीने 66 व्या वेळी 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. यासह डेविड वॉर्नरची बरोबरी केली. वॉर्नरने आयपीएलमध्ये 66 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि डेविड वॉर्नर यांनी सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. (सर्व फोटो- BCCI/IPL)