0.0.. 50! विराट कोहलीची अर्धशतकी खेळी, एका झटक्यात नोंदवले इतके सारे विक्रम

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा वनडे सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फलंदाजीकडे लक्ष होते. दोघांनी जबरदस्त फलंदाजी केली. इतकंच काय तर विराट कोहलीचं अर्धशतक महत्त्वाचं ठरलं.

| Updated on: Oct 25, 2025 | 3:36 PM
1 / 6
ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका भारताने आधीच गमावली आहे. मात्र तिसरा वनडे सामना विजयासह रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी महत्त्वाची होती. कारण दोघांचं पुढचं भवितव्य त्यांच्या खेळीवरच अवलंबून होतं.खासकरून विराट कोहलीसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा होता. कारण मागच्या दोन सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नव्हतं. (फोटो- BCCI Twitter)

2 / 6
विराट कोहलीने त्याच्या स्वभावाला साजेशी खेळी तिसऱ्या वनडे सामन्यात केली. शुबमन गिल बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. तेव्हा त्याने संयमी खेळी केली. त्याने 56 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. यासह विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2500 धावांचा पल्लाही गाठला आहे. (फोटो- BCCI Twitter)

3 / 6
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे. त्याने 293 सामन्यात 14235 धावांचा पल्ला गाठला आणि दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. सचिन तेंडुलकर 18426 धावा, कुमार संगकारा 14234, रिकी पॉन्टिंग 13704, सनथ जयसूर्याच्या नावावर 13430 धावा आहेत. (फोटो- BCCI Twitter)

4 / 6
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये शतकी भागीदारीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या स्थानावर असून त्याने 99 वेळा शतकी भागीदारी केली आहे. तर विराट कोहली 82 शतकी भागीदारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.  रिकी पॉन्टिंग 72, रोहित शर्मा 68 आणि कुमार संगकाराने 67 वेळा शतकी भागीदारी केली आहे. (फोटो- PTI)

5 / 6
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शतकी भागीदारीच्या यादीत रोहित शर्मा आणि विराट कोहली जोडी तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. रोहित आणि विराटने 101 सामन्यात 19 वेळा शतकी भागीदारी केली आहे. या यादीत सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली पहिल्या स्थानावर असून 176 वनडे सामन्यात 26 शतकी भागीदारी, दिलशान-संगकाराने 108 सामन्यात 20 शतकी भागीदारी, तर रोहित शर्मा शिखर धवनने 117 सामन्यात 18 शतकी भागीदारी केल्या आहेत. (फोटो- PTI)

6 / 6
सिडनी वनडे सामन्यात विराट कोहलीने मॅथ्यू शॉर्टला झेल घेत विश्वविक्रम केला.वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर शॉर्टचा झेल घेत एकाच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला. त्यानंतर कूपर कॉनोलीचा आणखी एक झेल घेतला. 78 झेलसह ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचा एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही मोडला. (फोटो- PTI)