कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वाईट विक्रमाची नोंद, वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा नकोसा रेकॉर्ड नावावर केला

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजला फक्त 27 धावांवार गुंडाळलं. यासह एक नकोसा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर प्रस्थापित झाला आहे.

| Updated on: Jul 15, 2025 | 5:17 PM
1 / 5
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 225 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव 143 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाला 82 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 121 धावांवर आटोपला. यासह 203 धावा झाल्या आणि विजयासाठी 2024 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ फक्त 27 धावांवर आटोपला.

2 / 5
वेस्ट इंडिजचा डाव 27 धावांवर आटोपला असला तरी आघाडीचे सहा फलंदाज फक्त सहा धावांवर तंबूत परतले. वेस्ट इंडिजने यासह सर्वात वाईट विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी कमी धावांवर सहा विकेट गमवण्याचा नकोसा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता.

3 / 5
 वेस्ट इंडिजचा सलामीवीर जॉन कॅम्पबेल शून्यावर बाद झाला. त्यानंतर क्लेवन अँडरसन (0) नेही पाठलाग पूर्ण केला. मायकेल लुईसने 4 धावा केल्या आणि आपली विकेट दिली. तर ब्रँडन किंग्ज (0) आणि रोस्टन चेस (0) आपलं खातं न खोलताच तंबूत परतले. तर शाई होप 2 धावा करून बाद झाला.

4 / 5
वेस्ट इंडिज संघाच्या पहिल्या सहा फलंदाजांनी फक्त 6 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या सहा फलंदाजांनी एकत्रित केलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या टॉप 6 फलंदाजांनी 12 धावा केल्या होत्या. 1888 मध्ये सिडनी येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 12 धावांवर 6 खेळाडू तंबूत परतले होते.

5 / 5
यापूर्वी वेस्ट इंडिजचा सर्वात कमी धावसंख्या 47 धावा होता.  त्यांनी 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या कसोटीत नकोसा विक्रम केला होता. तेव्हा पहिले सहा फलंदाज 47 धावांवर तंबूत परतले होते.  (सर्व फोटो- आयसीसी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज क्रिकेट ट्विटरवरून)