
आयपीएलदरम्यान दुखापत झालेला केन विल्यमसन गेल्या चार महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मात्र आयसीसी क्रमवारीत केनला पहिलं स्थान मिळालं आहे. पहिल्या क्रमांकावर असलेला जो रूट लॉर्ड्स कसोटीत अपयशी ठरला ठरल्याने चार स्थानांची घसरण झाली आहे. केन विल्यमसन अव्वल स्थानी पोहोचला आहे. केन विल्यमसन (न्यूझीलंड) 883 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

अॅशेस मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने चार स्थानांची झेप घेत दुसरं स्थान पटकावलं आहे. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 882 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया)- 873 गुण

ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)- 872 गुण

जो रूट (इंग्लंड)- 866 गुण

बाबर आझम (पाकिस्तान)- 862 गुण

उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)- 847 गुण

डॅरिल मिशेल (न्यूझीलंड)- 792 गुण

दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका)- 780 गुण

ऋषभ पंत (भारत)- 758 गुण