वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मागच्या 12 पर्वातील विजेते कोण? जाणून घ्या

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या 13 व्या पर्वातील विजेता काही तासातच कळणार आहे. आतापर्यंत झालेल्या 12 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाने जेतेपदाची चव चाखली आहे.

| Updated on: Oct 31, 2025 | 7:59 PM
1 / 5
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. स्पर्धेच्या 13व्या पर्वात क्रीडाविश्वाला नवा विजेता मिळणार हे नक्की झालं आहे. कारण यापूर्वी या दोन्ही संघांनी जेतेपदाची चव चाखलेली नाही. त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo- ICC Twitter)

2 / 5
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या पर्वात पहिल्यांदा जेतेपद मिळवलं. 1978 साली झालेल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर 1982 आणि 1988 साली जेतेपद मिळवून हॅटट्रीक साधली. त्यानंतर 1997, 2005 2013 आणि 2022 साली जेतेपदावर नाव कोरलं. पण यंदाच्या पर्वात भारताने ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पराभूत स्पर्धेतून बाद केलं. (Photo- ICC Twitter)

3 / 5
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडचं वर्चस्व राहिलं आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 1973 पासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच पर्वात इंग्लंडने जेतेपदाची चव चाखली. त्यानंतर 1993, 2009 आणि 2017 साली जेतेपदाला गवसणी घातली. मात्र पाचव्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं. कारण दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव केला. (Photo- ICC Twitter)

4 / 5
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड हा जेतेपदाची चव चाखणारा तिसरा संघ आहे. या स्पर्धेत न्यूझीलंडने फक्त एकदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. स्पर्धेच्या सातव्या पर्वात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला आणि जेतेपद मिळवलं. (Photo- ICC Twitter)

5 / 5
वनडे वर्ल्डकप जेतेपदाची टीम इंडियाला दोन संधी मिळाली होती. पण दोन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं. स्पर्धेच्या आठव्या पर्वात म्हणजेच 2002 साली भारताने अंतिम फेरीत धडक मारली होती. पण ऑस्ट्रेलियाने 98 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर 11 व्या पर्वात म्हणजेच 2017 साली अंतिम फेरीत इंग्लंडशी सामना केला होता. पण हा सामना 9 धावांनी गमावला. दुसरीकडे, या स्पर्धेच्या इतिहासात दक्षिण अफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. (Photo- BCCI Twitter)