
टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणारा युवा फलंदाज वेंकटेश अय्यर याने नव्या इनिंगच्या दिशेने वाटचाल केली आहे. वेंकटेश अय्यर याचा साखरपुडा झाला आहे.

वेंकटेश अय्यर आणि श्रुती रघुनाथन यांचा साखरपूडा केला आहे. वेंकटेशने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. वेंकटेशची होणारी भावी बायको नक्की कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.

वेंकटेशची होणारी पत्नी श्रुती हीच्याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. मात्र श्रुतीने विज्ञान शाखेतून पदवी शिक्षण घेतलं आहे.

श्रुतीने पदवीनंतर एनआयएफटीमधून फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय. रिपोर्ट्सनुसार, श्रुती एका खासगी कंपनीत नोकरी करते.

वेंकटेश अय्यर याने आंतरराष्ट्रीय डेब्यू केलंय. मात्र वेंकटेशला गेल्या 2 वर्षांपासून त्याला टीम इंडियात संधी मिळालेली नाही.

मात्र वेंकटेश आयपीएलमध्ये सातत्याने खेळतोय. वेंकटेश काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या आयपीएल 2023 मध्ये सहभागी झाला होता.