कोट्यवधींची प्राईझ मनी असूनही भारतीय संघ आशिया कपचे पैसे का घेत नाही? हे आहे पडद्यामागचं कारण

भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून महिला टी20 आशिया कप 2026 चे विजेतेपद पटकावले. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाने ट्रॉफी आणि प्राइज मनी न स्वीकारल्यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

| Updated on: Sep 14, 2026 | 3:25 PM
1 / 5
या वर्षीच्या महिला टी20 आशिया कपसाठी कोणत्याही प्राइज मनीची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी गेल्या काही वर्षांत आशिया कप जिंकणाऱ्या संघाला 21 कोटी रुपयांपर्यंत आणि उपविजेत्या संघाला 10.5 कोटी रुपयांपर्यंतची मोठी इनामी रक्कम मिळत आली आहे. (Photo: PTI)

या वर्षीच्या महिला टी20 आशिया कपसाठी कोणत्याही प्राइज मनीची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी गेल्या काही वर्षांत आशिया कप जिंकणाऱ्या संघाला 21 कोटी रुपयांपर्यंत आणि उपविजेत्या संघाला 10.5 कोटी रुपयांपर्यंतची मोठी इनामी रक्कम मिळत आली आहे. (Photo: PTI)

2 / 5

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आशिया कप जिंकल्यानंतर मिळणारी प्राइज मनी स्वतःकडे ठेवत नाही. त्याऐवजी, आशियातील इतर छोट्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या क्रिकेट बोर्डांचा विकास व्हावा आणि त्यांना पायाभूत सुविधा सुधारता याव्यात, म्हणून भारत ही रक्कम दुसऱ्या क्रिकेट बोर्डांना देतो. (Photo: PTI)

3 / 5

भारतीय महिला संघाने या स्पर्धेची विजेतेपदाची ट्रॉफी न घेण्याचा मोठा निर्णय घेतला. हे पाऊल मोहसीन नक्वी यांच्या विरोधामुळे उचलण्यात आले आहे. नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख असण्यासोबतच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री देखील आहेत. (Photo: PTI)

4 / 5

गेल्या वर्षी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या पुरुष संघाने आशिया कप जिंकला होता. त्यावेळी दहशतवादाचा निषेध नोंदवण्यासाठी भारतीय पुरुष संघाने पहिल्यांदा मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. (Photo: PTI)

5 / 5

पुरुष क्रिकेट संघाने पाकिस्तान सरकारच्या मंत्र्यांकडून ट्रॉफी न घेण्याचा जो निर्णय घेतला होता, त्याच राष्ट्रभक्तीच्या आणि निषेधाच्या भूमिकेची पुनरावृत्ती करत भारतीय महिला क्रिकेट संघानेही या वेळी तीच परंपरा कायम ठेवली आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us