
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 मुंबईकर खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियात मुंबईचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.

अजिंक्य रहाणे याने टीम इंडियात पुन्हा स्थान मिळवलं. इतकंच नाही तर अजिंक्यने गमवालेलं उपकर्णधार पद पुन्हा मिळवलं.

विंडिज विरुद्धच्या या पहिल्या कसोटीत 'द लॉर्ड' या नावाने ओळखला जाणार 'पालघर एक्सप्रेस' अर्थात शार्दुल ठाकुर याचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे.

तसेच युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याने विंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. अशाप्रकारे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकूण 4 मुंबईकरांचा समावेश आहे.