इंग्लंडमध्ये फेल गेलेला वैभव सूर्यवंशी आता नेपाळमध्ये जाणार? बीसीसीआयने आखला असा प्लान!

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका 0-3ने गमावली आहे. या मालिकेत पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी पूर्णपणे फेल गेला आहे. असं असताना बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मुंबईत संकेत दिले की, भारत अ संघ लवकरच नेपाळला जाईल.

| Updated on: Jul 10, 2026 | 8:13 PM
1 / 5
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ख्याती असलेलं बीसीसीआय लवकरच भारतीय खेळाडूंना नेपाळ दौऱ्यावर पाठवण्याच्या तयारीत आहे. सचिव देवजित सैकिया यांनी भारत अ संघाचा नेपाळ दौरा होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. (PC-GETTY IMAGES)

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ख्याती असलेलं बीसीसीआय लवकरच भारतीय खेळाडूंना नेपाळ दौऱ्यावर पाठवण्याच्या तयारीत आहे. सचिव देवजित सैकिया यांनी भारत अ संघाचा नेपाळ दौरा होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. (PC-GETTY IMAGES)

2 / 5

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नेपाळमधील क्रिकेटची लोकप्रियता वाढलेली पाहून बीसीसीआय नेपाळ क्रिकेट बोर्डाला पाठिंबा देईल. तसेच अ संघ तिथे पाठवणं एक मोठं पाऊल असेल. बीसीसीआयने याचे संकेत दिले आहेत. (PC-GETTY IMAGES)

3 / 5

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने खुलासा केला होता की, नेपाळ क्रिकेट बोर्डाने भारत अ संघाला नेपाळमध्ये पाठण्याबाबत बीसीसीआयशी संपर्क साधला होता. रिपोर्टनुसार भारत अ संघ नेपाळमध्ये किर्तीपूर येथे तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामना 9, 11 आणि 13 डिसेंबरला होणार आहेत. (PC-GETTY IMAGES)

4 / 5

भारत अ संघ नेपाळ दौऱ्यावर गेला तर या संघात वैभव सूर्यवंशीचा समावेश असण्याची शक्यता आहे. वरिष्ठ स्तरावरील त्याची कामगिरी पाहता तो आगामी स्तरासाठी तयार असल्याचं वाटत नाही. त्यामुळे त्याला भारत अ संघात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. (PC-GETTY IMAGES)

5 / 5

वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध तीन टी20 सामने खेळला असून त्यात अपयशी ठरला आहे. त्याने पहिल्या टी20 सामन्यात 14, दुसऱ्या टी20 सामन्यात 13 आणि तिसऱ्या टी20 सामन्यात 15 धावा केल्या आहेत. (PC-GETTY IMAGES)

Follow Us