विराट कोहली राजकोटमध्ये वनडे शतक का ठोकू शकला नाही? जाणून घ्या
विराट कोहलीला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. त्यामुळे त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. विराट कोहलीने पाच वनडे सामन्यात सलग शतक किंवा अर्धशतक ठोकलं आहे. विराट कोहली आता राजकोटमध्ये फलंदाजीसाठी उतरणार आहे. या सामन्यात त्याच्याकडे 17 वर्षांचा नकोसा विक्रम मोडण्याची संधी आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आणि 1-0 ने आघाडी घेतली. आता राजकोटमध्ये दुसरा वनडे सामना होणार आहे. विराट कोहली राजकोटमधील सामन्यात तीन विक्रम रचू शकतो. (Photo: BCCI Twitter)

विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये राजकोटच्या मैदानात यापूर्वी कधीही शतकी खेळी करू शकलेला नाही. मागच्या 17 वर्षांपासून शतकासाठी त्याची झुंज सुरू आहे. 17 वर्षानंतर विराट कोहली शतकाची भूक शमवण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली सध्या फॉर्मात आहे. (Photo: BCCI Twitter)

विराट कोहलीने राजकोटमध्ये आतापर्यंत एकूण 5 वनडे सामने खेळले आहे. निरंजन शाह स्टेडियममध्ये 4 सामने खेळला असून 56.5 च्या सरासरीने 226 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर राजकोटच्या माधवराव सिंधिया क्रिकेट ग्राउंडवर 27 धावा केल्या आहेत. (Photo: BCCI Twitter)

विराट कोहलीने गेल्या पाच सामन्यांमध्ये शतक किंवा अर्धशतक झळकावली आहेत. जर राजकोटमध्ये शतक किंवा अर्धशतक ठोकलं तर सलग सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय होईल. (Photo: BCCI Twitter)

राजकोट वनडे सामन्यापूर्वी जगातील नंबर 1 फलंदाज बनू शकतो. रोहित नंबर 1 एकदिवसीय फलंदाज आहे. परंतु वडोदरा एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या 93 धावांमुळे नंबर 1 फलंदाज बनू शकतो. विराट कोहली जवळजवळ पाच वर्षांनी पुन्हा एकदा नंबर 1 वर पोहोचेल. (Photo: BCCI Twitter)