
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 24व्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडने स्मृती मंधानाने शतकी खेळी केली. या वर्ल्डकप स्पर्धेतील तिने पहिलं शतक ठोकलं. (PHOTO- BCCI Women Twitter)

स्मृती मंधानाने 88 चेंडूत शतक पूर्ण केलं. शतकी खेली दरम्यान तिने 10 चौकार आणि तीन षटकार मारले. तिने 95 चेंडूत 109 धावा करून बाद झाली. स्मृती मंधानाने पहिल्या विकेटसाठी प्रतिका रावलसोबत 212 धावांची भागीदारी केली. वनडे करिअरमधील 14वं शतकं आहे. (PHOTO- BCCI Women Twitter)

स्मृती मंधानाने शतकासह महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकण्याचा मान मिळवला आहे. स्मृती मंधानाचं हे 17वं शतक आहे. यासह महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा बॅटर ठरली आहे. आता तिने मेग लॅनिंगच्या शतकांची बरोबरी केली आहे. तिनेही 17 शतकं ठोकली आहेत. (PHOTO- BCCI Women Twitter)

स्मृती मंधानाचं वनडे कारकिर्दीतील 14वं शतक आहे. सुजी बेट्सला मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडलच्या सुजी बेट्सच्या नावावर 13 शतकं आहेत. आता तिच्या पुढे ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग असून तिच्या नावावर 15 वनडे शतकं आहेत. (PHOTO- BCCI Women Twitter)

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील स्मृती मंधानाचं हे तिसरं शतक आहे. या शतकासह तिने हरमनप्रीत कौरच्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.स्मृती मंधानाकडे हा विक्रम मोडण्यासाठी आणखी एक सामना आहे. उपांत्य फेरी गाठली तर जास्तीची संधी मिळेल. (PHOTO- BCCI Women Twitter)