
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले आहेत. भारताने 47 षटकात 8 गडी गमवून 269 धावा केल्या आणि विजयासाठी 270 धावांचं आव्हान दिलं. या धावांमध्ये दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरची महत्त्वाची खेळी ठरली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. आघाडी फलंदाज झटपट बाद झाले. अवघ्या 124 धावांवर 6 गडी तंबूत होते. पण त्यानंतर दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरने डाव सावरला. अमनजोत कौरने आठव्या क्रमांकावर येत 57 धावांची महत्त्वाची खेळी केली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांनी सातव्या विकेटसाठी विक्रम नोंदवला आहे. या विकेटसाठी पहिल्यांदाच शतकी भागीदारी केली आहे. यापूर्वी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत असं घडलं नव्हतं. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

भारतीय संघाकडून सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या स्थानावर दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरने केलेली दुसरी मोठी भागीदारी आहे. यापूर्वी 2022 मध्ये पूजा वस्त्राकार आणि स्नेह राणा यांनी पाकिस्तानविरुद्ध 122 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरने 103 धावांची भागीदारी केली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा, 125 पेक्षा कमी धावसंख्येवर 6 विकेट गमावल्यानंतरही 250 च्या पुढे धावा केल्या गेल्या. यापूर्वी भारताने 2022 मध्ये पल्लेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध 124 धावांवर सहा विकेट गमावल्या होत्या. तरीही 9 विकेट गमवून 255 धावांपर्यंत मजल मारली होती. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)