ऋचा घोषने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवला मोठा विक्रम, दोन दिग्गजांसोबत मिळवलं यादीत स्थान

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतील छोट्या पण मोठ्या कामगिरीला विसरून कसं चालेल. ऋचा घोषने कायम आपल्या छोट्या खेळीत संघाला मोठी साथ दिली आहे. अंतिम सामन्यातही तिची खेळी महत्त्वाची ठरली. यासह तिने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

| Updated on: Nov 03, 2025 | 8:03 PM
1 / 5
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेला नमवून जेतेपद मिळवलं. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 298 धावांचं आव्हान ठेवलं होतं. एक वेळ इतक्या धावा होतील असं वाटलं नव्हतं. पण ऋचा घोषची छोटी खेळी महत्त्वाची ठरली. (Photo- BCCI Women Cricket Twitter)

2 / 5
ऋचा घोषने अंतिम सामन्यात 24 चेंडूत 34 धावा केल्या. या खेळीत तिने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. या दोन षटकारांच्या जोरावर ऋचा घोषने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. 2025 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo- BCCI Women Cricket Twitter)

3 / 5
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत ऋचा घोषने एकूण 12 षटकार मारले. यासह एका वर्ल्डकप पर्वात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या डिएंड्रा डॉटिन आणि लिजेल ली यांची बरोबरी केली. दोघांनी एका वर्ल्डकप पर्वात 12 षटकार मारले आहेत. (Photo- BCCI Women Cricket Twitter)

4 / 5
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऋचा घोष अव्वल स्थानी आहे. तिने एकूण 12 षटकार मारले. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेच्या नादिन डी क्लार्कचं नाव येतं. तिने 9 सामन्यात 10 षटकार मारले. स्मृती मंधाना तिसऱ्या स्थानी असून 9 षटकार मारलेत. (Photo- BCCI Women Cricket Twitter)

5 / 5
ऋचा घोष या स्पर्धेत एकूण 8 सामने खेळली आणि 39.16 च्या बॅटिंग एव्हरेजने 235 धावा केल्या. या स्पर्धेत तीन दोन वेळा नाबाद राहिल. या स्पर्धेत ऋचा घोषने सर्वाधिक 94 धावा केल्या आहेत.सर्वादिक धावा करणाऱ्या खेलाडूंच्या यादीत ऋचा घोष 12 स्थानावर राहिली. (Photo- BCCI Women Cricket Twitter)