
भारताने वेस्ट इंडिजला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केलं. पहिल्या सामन्यात एक डाव आणि 140 धावांनी मात दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 7 विकेट राखून पराभूत केलं. (फोटो- BCCI Twitter)

भारताने वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिल्यानंतरही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत फार काही फरक पडला नाही. गुणतालिकेत भारताची विजयी टक्केवारी वाढली पण तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे. नेमकं काय झालं ते समजून घ्या. (फोटो- BCCI Twitter)

ऑस्ट्रेलिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी ही 100 टक्के आहे. त्यामुळे अव्वल स्थानी आहे. (Photo- Cricket Australia Twitter)

श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. एका सामन्यात विजय आणि एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे 66.67 टक्क्यांसह आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणातालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo- Sri Lanka Cricket Twitter)

भारत आतापर्यंत सात कसोटी सामने खेळला आहे. त्यात भारताने 4 सामन्यात विजय, 2 सामन्यात पराभव, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे भारताची विजयी टक्केवारी ही 61.90 टक्के आहे. त्यामुळे तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड 43.33 गुणांसह चौथ्या स्थानावर, बांगलादेश 16.67 गुणांसह पाचव्या स्थानावर आणि वेस्ट इंडिज पाच पराभवांसह पाचव्या स्थानावर आहे.(फोटो- BCCI Twitter)

पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. कारण पाकिस्तानने तिसऱ्या दिवशी 277 धावांचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात काय होते याकडे लक्ष लागून आहे. सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट असल्याने दोनपैकी एका संघाला अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. यामुळे भारताची तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी घसरण होईल. (Photo- South Africa Twitter)