
टीम इंडिया सलग दुसऱ्यांचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 209 धावांनी पराभूत केलं. मिचेल स्टार्क याने या विजयानंतर टीम इंडियाच्या कोट्यधीश खेळाडूंची कानउघडणी केली आहे. "मी आयपीएल नक्कीच खेळेण पण ऑस्ट्रेलियासाठी खेळणं ही प्राथमिकता असेल",असं स्टार्कने म्हटलंय. (फोटो-पीटीआय)

मिचेल स्टार्क याने 'द गार्जियन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने देशासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याला प्रथम प्राधान्य असेल, असं म्हटलंय. याच कारणामुळे मी आयपीएल, बिग बॅश लीग आणि इतर टी 20 क्रिकेट स्पर्धांपासून दूर असल्याचंही स्टार्कने म्हटलं. (फोटो-पीटीआय)

"पैसा येत राहिल आणि जात राहिल. मात्र ऑस्ट्रेलियासाठी खेळण्याची संधी ही सर्वोच्च आहे", असं स्टार्कने नमूद केलं. (फोटो-पीटीआय)

टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू हे आयपीएल खेळतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते. त्यानंतर लगेचच खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी लंडनला रवाना झाले. (फोटो-पीटीआय)

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आयपीएलवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शास्त्री यांनी या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी बीसीसीआयकडे केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी WTC FINAL आणि अॅशेस सीरिजच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. खेळाडूंचा तो निर्णय योग्य ठरला. (फोटो-पीटीआय)