Wtc Final 2023 | टीम इंडियाची संधी हुकली आणि ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

WTC Final 2023 | टीम इंडियाचं सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलंय. तर ऑस्ट्रेलियाने बाजी मारत वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.

| Updated on: Jun 11, 2023 | 10:11 PM
1 / 6
ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियावर 209 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरली.

2 / 6
ऑस्ट्रेलियाने या विजयासह इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या सर्व स्पर्धेत जिंकणारी पहिली टीम ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण 9 वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केलीय.

3 / 6
ऑस्ट्रेलियाने एकूण 5 वेळा वनडे वर्ल्ड कप जिंकलाय. ऑस्ट्रेलियाने अखेरचा वनडे वर्ल्ड कप 2015 साली मायकल क्लार्क याच्या नेतृत्वात जिंकला होता.

4 / 6
ऑस्ट्रेलिया संघामध्ये एका भारतीय वंशाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूचे वडिल ऑस्ट्रेलियामधील सिडनी   येथे टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करतात.

5 / 6
कांगारुंनी 2006 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती.

6 / 6
तर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाचा धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियाने इतिहास रचला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी केलीय. टीम इंडिया जर wtc final जिंकली असती तर भारताच्या नावे हा विक्रम झाला असता. मात्र ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.