
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 207 धावांवर आटोपला. पहिल्या डावातील 74 धावांच्या आघाडीसह 281 धावा केल्या. तसेच 282 धावांचं आव्हान दिलं आहे. मिचेल स्टार्कने एका बाजूने नाबाद 58 धावा केल्या. स्टार्कने या खेळीसह एका खास क्लबमध्ये सहभागी झाला आहे. (Photo- ICC)

मिचेल स्टार्कने दहाव्या विकेटसाठी जोश हेझलवूडसह विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी मिळून 59 धावांची भागीदरी केली. पाचवी सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. हॅरी बॉयल-टप स्कॉट (ऑस्ट्रेलिया) 69, डेनिस लिली-अॅशले मॅलेट (ऑस्ट्रेलिया) 69, ग्रॅमी लॅब्रॉय-रवी रत्नायके (श्रीलंका), अजित आगरकर-आशिष नेहरा (भारत) 63, जोश हेझलवूड-मिचेल स्टार्क 59 धावांची भागीदारी केली. (Photo- ICC)

मिचेल स्टार्कने 136 चेंडूंचा सामना करत 58 धावांची नाबाद खेळी केली. यात पाच चौकारांचा समावेश होता. मिचेल स्टार्कने 97 कसोटी सामन्यातील 141 डावात एकूण 2276 धावा केल्या. यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo- ICC)

एकाच देशात कसोटी सामन्यांमध्ये नवव्या किंवा त्यापेक्षा कमी स्थानावर फलंदाजी करताना पाच वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारे फक्त दोनच फलंदाज आहेत. या दोन फलंदाजांमध्ये स्टुअर्ट ब्रॉड आणि मिशेल स्टार्क यांचा समावेश आहे. (Photo- Twitter)

मिचेल स्टार्कने त्याच्या कसोटी कारकिर्दीत पाचव्यांदा नवव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना एका डावात 100 पेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला आहे.या यादीत जेसन गिलेस्पी आणि चामिंडा वास त्याच्या पुढे असून त्यांनी सहा वेळा अशी कामगिरी केली आहे. (Photo- TV9 Hindi file Photo)