AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष आणि तन्वीची रात्री चर्चा, बिग बॉसमध्ये आज भांडणाऐवजी काय घडणार?

बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये एका अनोख्या गोष्टींवर चर्चा होणार असून सध्या आयुष आणि रुचिता सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

आयुष आणि तन्वीची रात्री चर्चा, बिग बॉसमध्ये आज भांडणाऐवजी काय घडणार?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 04, 2026 | 5:45 PM
Share

Bigg Boss Marathi 6 : कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी सिझन 6’ सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. घरात रोज नवनवीन घडामोडी, मतभेद, भांडणं आणि भावनिक क्षण पाहायला मिळत आहेत. मात्र आजच्या भागात भांडणाऐवजी तन्वी आणि आयुष यांच्यातील शांत, प्रामाणिक आणि विचारपूर्ण चर्चा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे.

घरातील वातावरण बहुतेक वेळा तणावपूर्ण असताना, आयुष आणि तन्वी यांच्यात झालेली ही गप्पांची मैफल वेगळीच ठरते. या चर्चेत आयुष दोघांच्या स्वभावातील फरक अतिशय हटके आणि मजेशीर पद्धतीने मांडताना दिसतो. चक्क जेवणातील पदार्थांची तुलना करून त्याने स्वतःचा आणि तन्वीचा स्वभाव स्पष्ट केला आहे.

‘मी ब्लँड, तू स्पायसी’ आयुषची अनोखी उपमा

या चर्चेदरम्यान तन्वी आपली भावना मोकळेपणाने व्यक्त करते. ती म्हणते की, ‘मी या बाबतीत खूप इमोशनल फुल आहे. मी जशी आहे, तसंच समोरच्याकडूनही अपेक्षा ठेवते. हे मला खूप लोकांनी समजावून सांगितलंय.’ यावर आयुष अतिशय शांतपणे आणि समजूतदारपणे उत्तर देतो. तो म्हणतो, पण प्रत्येक जण वेगळा असतो. आपण दोघंही एकमेकांच्या अगदी एक्स्ट्रीमली ऑपोझिट आहोत. तू माझ्याकडून थोड्या कमी अपेक्षा ठेव.

मात्र तन्वीला ते सहज मान्य होत नाही. ती स्पष्टपणे सांगते, मी तुला हेच करू शकत नाही. याच क्षणी आयुषने चर्चेला हलकंफुलकं आणि मजेशीर वळण दिलं. तो स्वतःला ‘ब्लँड’ तर तन्वीला ‘स्पायसी’ म्हणत म्हणाला, मी सामान्यतः एक ब्लँड माणूस आहे. तू एक स्पायसी डिश आहेस, ज्यात खूप फ्लेवर्स आहेत. मी म्हणजे व्हेज फ्राईड राइस आहे आणि तू ट्रिपल शेजवान मंचूरियन ग्रेव्ही आहेस त्यावर ऑम्लेट!

तन्वीचा मिश्कील प्रतिसाद

आयुषच्या या हटके तुलनेवर तन्वी गालातल्या गालात हसताना दिसते. ही तुलना केवळ मजेशीर नसून दोघांच्या स्वभावातील फरक अतिशय सोप्या भाषेत मांडणारी ठरते. भावनिक, व्यक्त होणारी तन्वी आणि शांत, कमी अपेक्षा ठेवणारा आयुष या दोन भिन्न स्वभावांची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ