
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 218 धावांची आघाडी घेतली आहे. (Photo Credit : Icc X Account)

या महाअंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने इतिहास घडवला आहे. स्टार्क आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. स्टार्कच्या या कामगिरीनिमित्ताने आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 4 गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Icc X Account)

मिचेल स्टार्क याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात 2 विकेट्स घेतल्या. स्टार्कने रायन रिकेल्टन आणि एडन मारक्रम या दोघांना आऊट केलं. स्टार्कने यासह टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि आयसीसी फायनलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. स्टार्कच्या नावावर आता 11 विकेट्सची नोंद झाली आहे. (Photo Credit : Icc X Account)

मोहम्मद शमीची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. शमीने आयसीसी फायनलमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. शमीची सरासरी या दरम्यान 38.90 अशी राहिली आहे. शमीने 2021 साली डब्ल्यूटीसी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध 76 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेत सर्वोत्तम कामगिरी केली होती. (Photo Credit : Icc X Account)

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टेंट बोल्ट आयसीसी स्पर्धेतील 4 अंतिम सामन्यांमध्ये खेळला आहे. बोल्टने या 4 सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. बोल्ट न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज आहे.(Photo Credit : Icc X Account)

या यादीत चौथ्या स्थानी टीम इंडियाचा स्टार आणि मॅचविनर ऑलराउंडर रवींद्र जडेजा विराजमान आहे. जडेजाने आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये एकूण 8 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)