
यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात या मालिकेतील दुसरं द्विशतक ठोकलं. यशस्वीने नाबाद 214 धावांची खेळी केली. यशस्वीच्या या खेळीत 12 सिक्स आणि 14 चौकारांचा समावेश होता. यशस्वीने या खेळीसह अनेक रेकॉर्ड केले. तसेच अनेक विक्रमांची बरोबरी केली.

यशस्वीने दुसऱ्या डावात 12 सिक्स ठोकले. यशस्वीने यासह एका डावात सर्वाधिक सिक्सच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली.

तसेच यशस्वी जयस्वाल एका मालिकेत सर्वाधिक सिक्स मारणारा फलंदाज ठरला. यशस्वीच्या नावावर आतापर्यंत 22 सिक्स झाले आहेत.

यशस्वी एका मालिकेत एकापेक्षा जास्त द्विशतक करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. यशस्वीने राजकोट आधी विशाखापट्टणममधील दुसऱ्या कसोटीतही द्विशतक केलं होतं.

यशस्वीने आणखी एक कारनामा केला आहे. यशस्वी सलग 2 सामन्यात द्विशतक करणारा तिसरा भारतीय फलंदाजही ठरला आहे.

तसेच यशस्वी जयस्वाल टीम इंडियासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा सलमीवीर ठरला आहे. यशस्वीच्या नावावर आतापर्यंत 3 सामन्यात 544 धावा झाल्या आहेत.