
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने या पर्वात जबरदस्त कामगिरी केली आहे. क्वॉलिफायर 1 मध्ये आता आरसीबीशी सामना होणार आहे. हा सामना पंजाबने जिंकला की थेट अंतिम फेरी गाठणार आहे. या सामन्यात युजवेंद्र चहल असेल की नाही? महत्त्वाच्या सामन्यात असेल याची खात्री क्रीडाप्रेमींना आहे. (Photo- BCCI/IPL)

युजवेंद्र चहलने साखळी फेरीत चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध हॅटट्रीक घेतली होती. आयपीएल 2025 स्पर्धेतील ही एकमेव हॅटट्रीक आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध कोणत्याही गोलंदाजाची ही पहिली हॅटट्रीक होती. युजवेंद्र चहलने 14 पैकी 12 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. (Photo- BCCI/IPL)

युजवेंद्र चहलने साखळी फेरीच्या शेवटच्या दोन सामन्यात भाग घेतला नव्हता. बोटाच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. आता पूर्णपणे फिट असून क्वॉलिफायर 1 फेरीत आरसीबीविरुद्ध खेळणार हे स्पष्ट आहे. त्याचाकडे संघाला जिंकवण्याचा आणि एक विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. (Photo- BCCI/IPL)

युजवेंद्र चहलने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तीन विकेट घेतल्या तर भारतात टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मिळेल. या यादीत पियुष चावला आघाडीवर आहे. त्याने 289 विकेट घेतल्या आहेत. तर चहलच्या नावावर 287 विकेट आहेत. म्हणजे तीन विकेट घेताच हा विक्रम चहलच्या नावावर होईल. (Photo- BCCI/IPL)

युजवेंद्र चहलने मुंबई इंडियन्ससोबत 2011 मध्ये प्रवास सुरु केला. त्यानंतर 2014 मध्ये आरसीबीसोबत आला. 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला. त्यानंतर 2025 पंजाब किंग्स संघात आला. (Photo- BCCI/IPL)