
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे आकाशातून पडला दगड पडल्याची खळबळजनक घटना घडली असून यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

हा उल्कापात आहे की इतर वस्तू याची चर्चा होत असून हा दगड महसूल विभागाने ताब्यात घेतला आहे. हा दगड भूजल सर्वेक्षण विभाग यांच्याकडे तपासणीसाठी पाठविला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी गावाजवळ प्रभू माळी यांच्या शेतात बांधाच्या गवतावर आकाशातून एक दगड पडला, दगड अर्धवट जळालेल्या स्वरूपात असल्याने भीतीचे वातावरण आहे. माळी हे काम करत असताना जोराचा आवाज झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.

उल्का की इतर काही हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या पडलेल्या दगडाचे दोन किलो ३८ ग्रॅम वजन असून सोनेरी रंगाचा दगड प्रशासनाने ताब्यात घेतला आहे.