हा प्रसिद्ध मराठी अभिनेता साकारणार नीम करोली बाबांची भूमिका

उत्तराखंडमधील नैनीताल जिल्हायात कैंची धाम हे अत्यंत पवित्र स्थान आहे. महान संत बाबा नीम करोली महाराजांचं आश्रम म्हणून हे ठिकाण ओळखलं जातं. लाखो भाविकांच्या भक्तीचं हे केंद्र असून नीम करोली बाबा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Updated on: Sep 26, 2025 | 1:01 PM
1 / 5
अभिनेता सुबोध भावेनं आतापर्यंत अनेकांच्या बायोपिक साकारल्या आहेत. बालगंधर्व, लोकमान्य- एक युगपुरूष, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या बायोपिकनंतर आता तो आणखी एका चरित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत त्याने माहिती दिली.

2 / 5
नीम करोली बाबा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात सुबोध भावे मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये सुबोध नीम करोली बाबा यांच्या लूकमध्ये पहायला मिळतोय. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत खास आणि अविस्मरणीय असल्याची भावना त्याने व्यक्त केली.

3 / 5
'तुमच्या प्रेम आणि आशीर्वादानेच हा प्रवास शक्य झाला आहे. आम्ही हा चित्रपट जितक्या समर्पण भावनेनं आणि प्रामाणिकपणे बनवला आहे, तितकाच तो तुम्हाला आवडेल अशी आशा आहे', असं त्याने म्हटलंय.

4 / 5
'आज लखनऊमध्ये आमच्या आगामी 'बाबा नीम करोली' यांच्या आयुष्यावर आधारित हिंदी चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण संपन्न झालं. बाबांची भूमिका साकारण्याचं भाग्य मला लाभलं. लवकरच हा चित्रपट रसिकांसमोर येईल,' अशी माहिती सुबोधने दिली आहे.

5 / 5
उत्तराखंडमधील कैची धामला भेट देण्यासाठी आणि नीम करोली बाबा यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जगभरातून अनेक भाविक येतात. क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासुद्धा कैची धामला गेले होते. अनेकांचं श्रद्धास्थान असलेल्या नीम करोली बाबा यांच्या आयुष्यावर हा हिंदी चित्रपट असेल.