
अमिताभ बच्चन हे लवकरच रजनीकांत यांचा चित्रपट Vettaiyan मध्ये दिसणार आहेत. दोघांची जोडी या चित्रपटात धमाल करताना दिसले. आता नुकताच रजनीकांत यांनी बिग बीबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय.

रजनीकांत यांनी म्हटले की, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यात अत्यंत वाईट काळ बघितला आहे. अमिताभ यांच्याकडून त्यांच्या सुरक्षारक्षकाला देण्यासाठीही साधे पैसे नव्हते. त्यांचा जुहूवाला बंगला देखील विक्रीसाठी होता.

पूर्ण बॉलिवूड त्यांच्यावर हसत होते. जग तुमच्या पडण्याचीच वाट बघते. पण तीन वर्षांमध्ये त्यांनी सर्वकाही बदलून टाकले. जाहिराती आणि केबीसी त्यांनी केले. त्यांनी खूप सारे पैसे कमावले. अवघ्या तीन वर्षांमध्ये त्यांनी परत त्यांची घरे मिळवली.

जुहूच्या त्याच रोडवर त्यांनी अजून एक घर खरेदी केले. ते खरोखरच माझी प्रेरणा असल्याचेही रजनीकांत यांनी म्हटले. 82 वर्षांचे असूनही ते तब्बल दहा तास काम करत असल्याचे रजनीकांत यांनी म्हटले.

रजनीकांत आणि अमिताभ बच्चन हे खूप चांगले मित्र नक्कीच आहेत. दोघांचाही चाहतावर्ग जबरदस्त असा बघायला मिळतो. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत.