
बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता, झापूक झुपूकचा हिरो आणि साध्या भोळ्या अंदाजाने लोकांचं मन जिंकून घेणारा सुरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या बराच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याचं नव घर बांधून पूर्ण झालं आणि त्याने गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केला , जो बघता बघता प्रचंड व्हायरल झाला. त्यावर हजारो लाईक्स, कमेंट्स आल्या. आता सुरजच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरूवात होत असून अवघ्या काही दिवसांत त्याचं लग्न आहे. मात्र त्यापूर्वी त्याने त्याची होणारी पत्नी संजना हिच्यासोबत प्री-वेडिंग फोटोशूट केलं, त्याचे सुंदर फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ( All Photos : Social Media)

काही दिवसांपूर्वीच सुरजच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती. येत्या 29 तारखेला तो संजना गोफणे हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच दिवशी दुपारी आधी त्यांचा साखरपुडा, नंतर हळद आणि संध्याकाळच्या मुहुर्तावर विवाह पार पडणार आहे. लाडक्या सुरजच्या लग्नासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

लग्न जसजसं जवळ येत चाललं आहे तशी लोकांची उत्सुकता वाढत असून नुकताच संजना-सुरजच्या प्री-वेडिंगचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत. एका स्टुडिओमध्ये केलेल्या या शुटिंगदरम्यान दोघेही वेगवेगळ्या गेटअपमध्ये, सुंदर कपड्यात दिसत आहेत. त्यांचा हा अनोखा अंदाज चाहत्यांनाही खूप आवडला .

तू है तो दिल धडकता है, तू है तो सांस आती है... असं सुंदर गाणं मागे वाजत असतानाच सुरजचा रोमँटिंक अंदाज यात दिसत आहे. डेनिमचं जॅकेट, जीन्स, हातात गुलाब असा सुरजचा अनोखा अंदाज पाहून चाहते अवाक् झाल. तर त्याची होणारी पत्नी संजना हीदेखील पाढरा फ्रॉक, त्यावर डेनिम जॅकेट, खुले केस, चेहऱ्यावर हास्य अशा रुपात सुंदर दिसत्ये.

रेड गाऊन घातलेली संजना आणि व्हाईट टीशर्ट, ब्लॅक जॅकेट, ब्लॅक पँट अशा अंदाजात असलेल्या सूरजचा हा लूकही लोकांना खूप आवडला. आधुनिक कपड्यांसोबतच सुरजने पारंपारिक शेरवानी तसेच संजनाचा, वर्क केलेला गुलाबी रंगाचा ड्रेस, अशी विविध गेटअमध्येही हे फोटोशूट केलं आहे. त्यांच्या या फोटोजना खूप पसंती मिळत आहे.

सुरज चव्हाण-संजना यांच हे अरेंज नव्हे तर लव्ह मॅरेज आहे. सुरज त्याच्या चुलत मामाच्या लेकीशी लग्न करणारा असून दोघेही लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात. त्यांच्या लग्नासाठी सर्वच उत्सुक आहेत.

काही दिवसांपूर्वीच कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभु वालावलकर हिने सुरज-संजनाचं केळवणं केलं, तेव्हा संजनाचं नाव सर्वांना समजलं आणि तिचा चेहरा सर्वांसमोर रिव्हिल झाला. त्या दोघांनी अंकितासोबत लग्नाची शॉपिंग, दागिने खरेदी वगैरेही केली. आता सर्व चाहत्यांना 29 नोव्हेंबरची उत्सुकता असून सुरजच्या लग्नाचे फोटो पाहण्यास सगळे उत्सुक आहेत.