
अगदी गरीब कुटुंबातून आलेला, हालाकीच्या परिस्थिती मोठा झालेला, डोक्यावर आई-वडीलांचा हात नसलेला, साध्यासरळ स्वभावाच्या सूरज चव्हाणला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. टिकटॉकमुळे रातोरात स्टार झालेल्या सूरजने बिग बॉस मराठीचा सिझन पाच जिंकला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता हाच सूरज लग्न बंधनात अडकणार आहे. पण हे सूरजचे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज वाचा...

सूरजने काही दिवसांपूर्वी प्रीवेडींचे फोटो शेअर केले होते. आधी सर्वांना हे फोटो सूरजच्या आगामी प्रोजेक्टशी संबंधीत असल्याचे वाटले होते. पण नंतर सूरजने लग्न करत असल्याचे सर्वांना सांगितले. हळूहळू सूरजच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाच्या खरेदीचे, केळवणाचे फोटो दिसू लागले. नंतर सूरजने प्रीवेडींग फोटोशूटही केले.

सूरज चव्हाणचा लग्न सोहळा हा 29 नोव्हेंबरला पार पडणार आहे. लग्नापूर्वीच्या विधींचे त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सूरज हा संजनासोबत संसार थाटणार आहे. आधी सूरज एका पत्र्याच्या घरात राहात होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला घर बांधून देण्याचे वचन दिले होते. ते वचन त्यांनी पूर्ण केले आहे. आता लग्नानंतर सूरज या बंगल्यात संजनासोबत राहणार आहे.

सूरजचे संजना गोफणेशी 29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.11 मिनिटांनी पुण्याजवळील सासवडमध्ये धुमधडाक्यात पार पडणार आहे. या लग्नाला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित असणार असे म्हटले जात आहे. त्यामध्ये मराठी सेलिब्रिटी, राजकीय नेते, इन्फ्लूएंसरचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. आता कोणते कोणते कलाकार देखील येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सूरज चव्हाणचे हे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरता असताना एकदा ब्रेकअप विषयी बोलला होता. त्यानंतर त्याच्या आयुष्यात कोणतीही मुलगी नव्हती. आता सूरज चव्हाणचं संजना गोफणेशी अरेंज मॅरेज होत आहे. तो आपल्या चुलत मामाच्या मुलीशीच लग्न करत आहे.