
बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) याचं आज लग्न. सासवड जवळ असलेल्या एका हॉलमध्ये तो आज संध्याकाळी संजना गोफणे हिच्याशी लग्न करणार आहे. घाणा भरणे, मेहंदी अशा लग्नापूर्वीच्या विधींना दोन-तीन दिवसांपूर्वीच सुरूवात झाली असून त्यांच्या प्री-वेडिंगचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते. दरम्यान लग्नापूर्वी काल सुरजची हळद झाली, त्यामध्ये त्याने धमाकेदार डान्स केला. विशेष म्हणजे बिग बॉस मराठीच्या घरात त्याच्यासोबत असलेल्या टीम मेंबरनेही हळदीला हजेरी लावत तूफान नृत्यही केलं.

काही दिवसांपूर्वी सुरजच्या नव्या घराचा गृहप्रवेश झाला. पत्र्याचं घरं होतं, तिथे आता आलिशान बंगला झाला. सुरजने गृहप्रवेशाचा व्हिडीओ टाकताच तो भयानक व्हायरल झाला. शुभेच्छांचा वर्षाव त्याच्यावर करण्यात आला. त्या व्हिडोसोबत कॅप्शन लिहीताना त्याने अजित पवार यांचे आभऊार मानले होते. नंतर अजित दादांनीही त्याला शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर सुरजची लगीनघाई सुरू झाली. काही दिवसांपूर्वीच त्याचं व संजनाचा प्री-वेडिंग फोटोशूट पार पडल. वेगवेगळे आऊटफिट्स घालून, सुंदर दिसत त्या दोघांनी हे फोटोशूट केलं, ज्याचा व्हिडीोही सओशल मीडियावर खूप गाजतोय. त्आल अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सूरजच्या पत्नीचा मेहंदी सोहळ्याचीही खूप चर्चा झाली. संजना हिच्या हातावरील सुंदर मेहंदीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एका हातावर तिचं आणि सुरजचं नावं तर दुसऱ्या हातावर झापूक झुपूक लिहीलेला डायलॉग हीही विशेष आकर्षण ठरला.

काल सुरजची हळद आणि डान्स पार पडला. त्याच्या लग्नाची पत्रिकाही व्हायरल झाली असूवन अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख अशा अनेक मान्यवरांचं नाव गेस्ट लिस्टमध्ये आहे. तसंच बिग बॉस मराठी सीझनमध्ये त्याच्यासोबत असलेले टीम मेंबर्स यांनाही सुरजने लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, आर्या जाधव, इरीना, अभिषेक करंगुटकर, अरबाज पटेल, निखिल दामले, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, संग्राम चौगुले, पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, घनश्याम दरोडे, अंकिताचा नवरा कुणाल भगत आणि उत्कर्ष शिंदे यांसारख्या अनेकांचा त्यामध्ये उल्लेख आहे.

त्यांच्यापैकी एक मेंबरने तर कालच सुरजच्या गावी हजेरी लावली. जान्हवी किल्लेकर ही काल सुरजच्या हळदीसाठी आली होती. गुलाबी ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसणाऱ्या जान्हवीने हळदीमध्ये सुरज व इतर कुटुंबियांसह तूफान डान्स केला. दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य विलसत होतं. त्यांचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

आज संध्याकाळा सुरजचं लग्न होणार असून आता त्याला कोण कोण मान्यवर हजर राहतात आणि सुरज-संजनाला आशिर्वाद देतात हे पाहण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. नव्या आयुष्याला सुरूवात करणाऱ्या सुरजला सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.