काळ्या जादूचा प्रयोग, अश्लील व्हिडीओ दाखवून… हगवणेशी कनेक्शन असणारं चोंधे कुटुंब सूनेसोबत काय करायचं?

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या सुयश चोंधे, संकेत चोंधे यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

| Updated on: May 27, 2025 | 8:28 PM
1 / 8
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची मदत करणाऱ्या संकेत चोंधे आणि सुयश चोंधे यांचे धक्कादायक कांड समोर येत आहेत. (फोटोमधील व्यक्ती-संकेत चोंधे)

2 / 8
संकेत चोंधे याच्या भावजईने चोंधे कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहेत. या प्रकरणी पीडित विवाहितेने महिला आयोगाकडे तक्रारही दाखल केल्याचे समजत आहे.

3 / 8
पीडित विवाहितेवर पती सुयश चोंदे तसेच सासू-सासरे, दीर यांनी अन्याय, अत्याचार केल्याचा आरोप पीडित विवाहितेने केला आहे.

4 / 8
यासह सुयश चोंधे हा पीडित विवाहितेला अश्लील व्हिडिओ दाखवून जबरदस्ती करायचा, असाही आरोप करण्यात आला आहे. तसेच दाखवलेल्या व्हिडिओप्रमाणे शारीरिक संबंध ठेवण्यास सुयश चोंधे याच्याकडून पीडित असलेल्या त्याच्या पत्नीवर जबरदस्ती केली होती, असाही आरोप करण्यात आला आहे.

5 / 8
या धक्कादायक प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सुयश चोंधे आणि त्याचा भाऊ संकेत चोंधे या दोघांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळून जाण्यास मदत केली होती. त्यांनी हगवणे बाप-लेकाला पळून जायला थार ही कार दिली होती.

6 / 8
विशेष म्हणजे पीडित विवाहितेची सासूदेखील तिला वेगवेगळ्या प्रकारे छळत होती. पीडितेची सासू वैशाली चोंधे काळी जादू करण्यासाठी करायची.

7 / 8
नवरा-बायको वेगळे व्हावेत म्हणून तक्रारदार महिलेवर तिची सासू वैशाली चोंधे काळ्या जादूचे प्रयोग करायची.

8 / 8
या प्रकरणामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पीडित विवाहिता ही बावधन पोलीस ठाण्यात पोहोचली असून यातून आणखी नेमकं काय बाहेर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.