AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs KKR : कॅप्टन गिलचा तडाखा, गुजरातची विजयी हॅट्रिक, कोलकाताचा पाचवा पराभव

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Match Result, IPL 2026 : गुजरातने केकेआरला पराभूत करत 19 व्या मोसमातील आपला सलग आणि एकूण तिसरा सामना जिंकला आहे. विशेष म्हणजे गुजरातने तिन्ही सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात जिंकले आहेत.

GT vs KKR : कॅप्टन गिलचा तडाखा, गुजरातची विजयी हॅट्रिक, कोलकाताचा पाचवा पराभव
Shubman Gill GT vs KKR IPL 2026Image Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 18, 2026 | 4:56 AM
Share

शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सची आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) पराभवाने सुरुवात झाली होती. गुजरातला आपल्या मोहिमेतील पहिल्या 2 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. मात्र त्यानंतर गुजरातने जोरदार कमबॅक केलंय. गुजरातने 17 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सवर 5 विकेट्स विजय मिळवला.  गुजरातने यासह विजयी हॅट्रिक पूर्ण केली.  केकेआरने गुजरातसमोर 181 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. गुजरातने हे आव्हान 2 बॉलआधी पूर्ण केलं. गुजरातने 5 विकेट्स गमावून 19.4 ओव्हरमध्ये 181 रन्स केल्या. तर कोलकाताचा हा सलग तिसरा तर एकूण पाचवा पराभव ठरला. या पराभवामुळे केकेआरची सहाव्या सामन्यानंतरही पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम आहे.

केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर केकेआरने 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 180 रन्स केल्या. केकेआरसाठी ग्रीनने 55 बॉलमध्ये 79 रन्स केल्या. रोव्हमॅन पॉवेल याने 27 धावा जोडल्या. टीम सायफर्ट याने 19 तर रमनदीप सिंह याने 17 धावांचं योगदान दिलं. गुजरातसाठी कगिसो रबाडा याने 3 विकेट्स मिळवल्या. मोहम्मद सिराज आणि अशोक शर्मा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर प्रसिध कृष्णा आणि राशिद खान या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

गुजरातनेही विजयी धावांचा पाठलाग करताना सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचला. त्यामुळे कोलकाता गुजरातच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावते की काय असं वाटत होतं. मात्र गुजरातने सुरक्षितपणे विजय मिळवला.

स्कोअरकार्ड

शुबमनची विजयी खेळी, गुजरातची हॅट्रिक

गुजरातच्या विजयात कॅप्टन शुबमन गिल याने बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं. तसेच इतरांनीही योगदान दिलं. शुबमनने 50 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 86 धावांची खेळी केली. साई सुदर्शन याला चांगली सुरुवात मिळाली. मात्र साईने निराशा केली. साई 22 धावांवर बाद झाला. जोस बटलर याने 25 रन्स केल्या. वॉशिंग्टन सुंदर याने 13 तर ग्लेन फिलिप्स याने 19 धावा करुन विजयाजवळ आणून ठेवलं. तर राहुल तेवतिया आणि शाहरुख खान या जोडीने गुजरातला विजयापर्यंत पोहचवलं. राहुलने नाबाद 7 धावा केल्या. तर शाहरुखने नॉट आऊट 3 रन्स केल्या. केकेआरसाठी वरुण चक्रवर्ती याने 2 विकेट्स मिळवल्या. तर वैभव अरोरा, सुनील नारायण आणि रमनदीप सिंह या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...