AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs KKR : कोलकाताचा पहिल्या विजयासाठी बॅटिंगचा निर्णय, गुजरात विरुद्ध 1 बदल, किती धावा करणार?

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Toss and Playing 11 : कोलकाता नाईट रायडर्सची 19 व्या मोसमात अतिशय वाईट स्थिती आहे. त्यामुळे केकेआरसाठी गुजरात विरुद्धचा सामना हा अतिशय महत्त्वाचा आहे निर्णायक असणार आहे. केकेआरने या सामन्यासाठी टीममध्ये बदल केला आहे.

GT vs KKR : कोलकाताचा पहिल्या विजयासाठी बॅटिंगचा निर्णय, गुजरात विरुद्ध 1 बदल, किती धावा करणार?
GT vs KKR Toss IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 17, 2026 | 8:10 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात यजमान गुजरात टायटन्ससमोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. केकेआरच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन अजिंक्य रहाणे याने पहिले बॅटिंग करणआर असल्यांच जाहीर केलं. केकेआरचा हा या मोसमातील सहावा सामना तर आहे. गुजरातचा हा पाचवा सामना आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल

गुजरातने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला केकेआरकडून 1 बदल करण्यात आला आहे. फिन एलन याच्या जागी टीम सायफर्ट याचा समावेश करण्यात आला आहे. कॅप्टन अजिंक्य रहाणे याने टॉसनंतर याबाबतची माहिती दिली.

दोन्ही संघांची कामगिरी

केकेआर आणि गुजरात या दोन्ही संघांना आतापर्यंत 19 व्या मोसमात आपल्या लौकीकाला शोभेल अशी कामगिरी करता आलेली नाही. केकेआरने एकूण 3 तर गुजरातने एकदा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मात्र दोन्ही संघांना चॅम्पियन या टॅगला शोभेल अशी या मोसमात आतापर्यंत तरी कामगिरी करता आलेली नाही. गुजरातने 4 पैकी 2 सामन्यांत विजय मिळवला आहे. गुजरात 4 गुण आणि -0.029 या नेट रनरेटसह पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी विराजमान आहे.

गुजरातला या मोसमात आपल्या मोहिमेतील पहिल्या 2 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. मात्र त्यानंतर गुजरातने जोरदार कमबॅक करत सलग 2 सामने जिंकले. त्यामुळे गुजरातचा केकेआरवर मात करुन सलग आणि एकूण तिसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सहाव्या सामन्यात केकेआरसमोर विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे. केकेआर आतापर्यंत या मोसमात एकही सामना न जिंकणारी पहिलीच टीम आहे. केकेआरला 5 पैकी 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. केकेआरचा 1 सामना पावसाने वाया घालावलाय. त्यामुळे केकेआर कमबॅक करणार की गुजरात विजयी हॅट्रिक करणार? याची उत्सूकता चाहत्यांना असणार आहे.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, रशीद खान, अशोक शर्मा, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : टीम सायफर्ट, सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), कॅमेरुन ग्रीन, अंगकृष रघुवंशी (विकटेकीपर), रोवमन पॉवेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, वैभव अरोरा आणि कार्तिक त्यागी.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...