AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच

वनप्लस पॅड 4 भारतात 30 एप्रिल रोजी लाँच होईल. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेट आणि मोठी 13,380mAh बॅटरी असेल. चला तर मग या पॅडची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच
PadImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Apr 17, 2026 | 11:45 PM
Share

OnePlus Pad 4 टॅबलेटची भारतातील लाँचची घोषणा करण्यात आली आहे. हा वनप्लस टॅबलेट या महिन्यात सादर होणार आहे. टॅबलेटच्या लाँच तारीख जाहीर करताना, कंपनीने स्पष्ट केले की तो भारतातील दोन फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. लाँचच्या तारखेसोबतच कंपनीने आगामी वनप्लस पॅड 4 टॅबलेटची प्रमुख वैशिष्ट्ये, फिचर्स आणि डिझाइनबद्दलची माहिती देखील शेअर केली आहे. चला आजच्या लेखात याबद्दल जाणून घेऊयात.

OnePlus Pad 4 भारतातील लाँचची तारीख

वनप्लसचा आगामी टॅब्लेट OnePlus Pad 4 हा 30 एप्रिल रोजी भारतात लाँच केला जाईल. हा टॅब्लेट भारतात वनप्लसच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्स तसेच फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.

वनप्लस पॅड 4 मध्ये काय खास असेल?

लाँचच्या तारखेसोबतच वनप्लसने आगामी वनप्लस पॅड 4 चे काही स्पेसिफिकेशन्सदेखील शेअर केले आहेत. कंपनीने पुष्टी केली आहे की, हा टॅबलेट क्वालकॉमच्या फ्लॅगशिप ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेटवर चालेल, जो चिपसेट वनप्लस 15 स्मार्टफोनमध्ये वापरला गेला होता.

कंपनीचा दावा आहे की वनप्लस पॅड 4 ने अँटूटू बेंचमार्क प्लॅटफॉर्मवर 41,86,268 गुण मिळवले आहेत. याव्यतिरिक्त, कंपनीचा दावा आहे की टॅब्लेटच्या सीपीयूची कामगिरी 20 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे, तसेच सीपीयूची कार्यक्षमता 35 टक्क्यांनी, जीपीयूची कामगिरी 23 टक्क्यांनी आणि जीपीयूची ऊर्जा कार्यक्षमता 20 टक्क्यांनी सुधारण्यात आली आहे.

वनप्लसने पुष्टी केली आहे की या टॅबलेटमध्ये 13.25-इंचाचा 3.4के पिक्सेल्स 12-बिट ट्रू कलर डिस्प्ले असेल. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144Hz आणि पीक ब्राइटनेस 1000 निट्स आहे.तसेच या टॅबलेटचा डिस्प्ले डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येईल.

वनप्लस पॅड 4 टॅबलेटच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात पिल-शेप्ड रियर कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यामध्ये लेन्स आणि एलईडी फ्लॅश असतील.

वनप्लसच्या आगामी टॅबलेटमध्ये 13,380mAh क्षमतेची बॅटरी असेल. कंपनीचा दावा आहे की, वनप्लस पॅड 4 एका चार्जवर 54 दिवसांचा स्टँडबाय टाइम, 20 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक आणि 7 तासांचा गेमिंगचा अनुभव देतो.

हा टॅबलेट वनप्लस स्टायलो प्रो स्टायलसला देखील सपोर्ट करेल. कंपनीने हे देखील निश्चित केले आहे की, वनप्लस पॅड 4 मध्ये आठ-स्पीकर सेटअप असेल, ज्यामध्ये चार बेस स्पीकर्स आणि चार ट्वीटरचा समावेश असेल.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप