
बारामती जवळच्या गोखळी येथील स्वरा भागवत या सात वर्षाच्या मुलीने महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखरावर तिने 1 तास 56 मिनिटे एवढ्या कमी वेळेत कळसुबाईचे शिखर पार केले आहे.

स्वरा योगेश भागवत सात वर्षांची असणारी मुलगी व्यायामाचे विविध प्रकार करते. दहा तासात 143 किलोमीटर सलग सायकल चालवल्याने ही स्वरा सोशल मीडियावर चर्चेत आली होती.

स्वराने सायंकाळी 6 वाजता 1 मिनिटांनी शिखर सर करण्यासाठी सुरूवात केली व 7 वाजून 57 मिनिटांनी हे शिखर सर केले. स्वराने वयाच्या 7 व्या वर्षी केलेल्या विक्रमाबद्दल महाराष्ट्राचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तिचा गौरव केला.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळील कठीण असणारा हरिहर गड ट्रेक करून दुसऱ्याच दिवशी 18 फेब्रुवारी रोजी स्वरा भागवतने शिवजयंतीच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले. 1 तास 56 मिनिटे एवढ्या कमी कालावधीत हा ट्रेक पूर्ण केला.

स्वराने यापूर्वी 10 तासात 143 किलोमीटर सायकलिंग सहाव्या वर्षी विक्रम केला तर स्वराच्या 50 प्रकारच्या दोरीवरील उड्या, 1 मिनिटात 100 पुश्यप काढणे आदी विक्रमाची 'इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड'ने नोंद घेतली.