
बॉलिवूडमधील गुणी अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे. जून महिन्यात प्रेग्नंन्सीची घोषणा केल्यापासून ती चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ती बरीच ॲक्टिव्ह असते. (Photo : Twitter)

स्वराने सोमवारी सोशल मीडियावर काही नवे फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती बेबी बंप फ्लाँट करतातना दिसत आहे.

ब्ल्यू कलरचा सुंदर वन पीस घातलेल्या स्वराच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद झळकत आहे.

या फोटोंमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे.. स्वराने गेल्या महिन्यात तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. पती फहादसोबत काही छान फोटो पोस्ट करत तिने ही गुड न्यूज सगळ्यांसोबत शेअर केली होती.

या वर्षी सुरूवातीलाच स्वराने फहाद अहमदशी धूमझडाक्यात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटोही बरेच व्हायरल झाले होते.